शोषणाच्या वेदनेची ओल ज्यांनी जाणिली अन् तिमिर डोही एक पणती लाविली, त्यांना सलाम !
तो वसा जाणुनी ज्यांनी राउळे मांडिली, अन् मार्गदर्शी दीप स्तंभी मांडिले, त्यांना सलाम !
त्या चिऱ्यांवर नांव अपुले कोरिले, अन् बावटे अपुलेचि मिरवुन नाचले, त्यांना सलाम
मूलमंत्रांच्या ऋचा कर्मकाण्डी गाडिल्या, अन् वल्गनांचे घोष ज्यांनी कंठाळले, त्यांना सलाम !
शोषितांच्या प्रेषितांचे ढोंग ज्यांनी वठविले, अन् तृप्त उदरी तोषुनी सुस्तावले, त्यांना सलाम !
खोगिरांची भरती जी, मातली मस्तावली, अन् तुडविले देवटांके बुद्ध्याचि, त्यांनाही सलाम !
तें तिथें घडले, कां न ठावे, ना जणिले परि, अन् लाविली चूड अपुल्याचि सदना, त्यांना तर सलामच सलाम !
ठिणगीने त्या जळली राणी दख्खनची अन् मख्ख बसले सह्यकडे धास्तावलेले, त्यांनाही सलाम !
कवि- अरुण वडुलेकर
Wednesday, March 21, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
मस्त! अरूणजी कविता मस्तच आहे. तुम्हालाही सलाम!
Post a Comment